POLICE BHARTI PHYSICAL REQUIREMENT | पोलीस भरती शारीरिक पात्रता - २०२० - AXN ZONE POLICE & ARMY TRAINING ACADEMY

POLICE BHARTI PHYSICAL REQUIREMENT | पोलीस भरती शारीरिक पात्रता - २०२०

POLICE BHARTI PHYSICAL REQUIREMENT

पोलीस भरती शारीरिक पात्रता - २०२० 

                            महाराष्ट्र पोलीस  हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १० पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पध्दतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात १० आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे.

पोलीस भर्तीसाठी आवश्यक शारीरिक पात्रता 


पोलीस भर्तीसाठी लागणारी वयाची अट 

खुल्या प्रवर्गातील उमेदवार - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट 18 ते 28 वर्षापर्यंत आहे.
मागासवर्गीय उमेदवार - मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट 18 ते 33 वर्षापर्यंत आहे.



ऊंची 
पुरुष - पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी ऊंची ही 165 से‍मी  असावी.

महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 155 सेमी असावी



छाती 


पुरुष उमेदवारांची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी.

महिला उमेदवांसाठी लागू नाही.

परीक्षेचा अभ्यासक्रम 


  अंकगणित     


सामान्य ज्ञान व चालू घडामोडी  


बुद्धीमत्ता चाचणी 


मराठी व्याकरण 



POLICE BHARTI PHYSICAL REQUIREMENT

                 Maharashtra Police is a law and order organization in the state of Maharashtra, India. Maharashtra Police is one of the largest police force in the country and has 5 police commissioners and 1 district police. Maharashtra Police Headquarters is located in Mumbai. Maharashtra is the third largest state in the Indian Republic and the police force in Maharashtra is one of the largest police force in the country. Maharashtra is an advanced state in industrialization and has many urban business and commercial organizations. In the big cities of Maharashtra, the Commissioner has been adopted for the functioning of the police. There are 3 Commission offices in the State and 3 District Police units. This is the motto of the Maharashtra Police. This means that the Maharashtra Police are committed to protecting the gentlemen and controlling the evil and destroying them. The Director General of Police is the head of the Maharashtra Police and the State Police Headquarters is in Mumbai.

Physical eligibility required for police recruitment

Male & Female Candidate Age requirements for police recruitment


Open Category Candidates - The age range for open category candidates is from 18 to 28 years.

Backward Classes - The age limit for candidates belonging to Backward Classes is from 18 to 33 years.


Height

For male candidates, the minimum height should be 165 cm.

The minimum height for women candidates should be 155 cm


Chest

The male candidate's chest should not be less than 79 cm without inflation.

Not applicable for female candidates.



 Examination Subjects 


  Arithmetic

General knowledge  and current affairs

Intelligence test

Marathi Grammar

telegram link